नरडाणा एमआयडीसीत अन्न सुरक्षा विभागाची कारवाई : आठ लाखांचा पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर साठा जप्त


धुळे (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या धुळे पथकाने नरडाना एमआयडीसीतील एका पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर उत्पादन आस्थापनेची तपासणी करून मोठी कारवाई केली. या कारवाईत आठ लाख एक हजार 632 रुपये किंमतीच्या 80 हजार 208 पेट बॉटल्सचा साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

पाणी कमी दर्जाचे असल्याचा संशय
धुळे जिल्ह्यातील नरडाना एमआयडीसीतील बिव्हरेजेस एलएलपी, प्लॉट क्र. टी-11 या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ‘बरेली’, ‘ग्रीष्मा एक्वा’ आणि ‘एक्वा अजंता’ या ब्रँडच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. हे अन्नपदार्थ मिथ्या छापाचे तसेच कमी दर्जाचे असल्याचा संशय असल्याने आस्थापनेतील उर्वरित 80 हजार 208 पेट बॉटल्सचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक सहआयुक्त मंगेश माने, सहाय्यक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे, आनंद पवार, शशिकांत राणे, अन्न सुरक्षा अधिकारी अभिजीत जाधव अरविंद राऊत, मंगेश भावसार आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !