वरणगावातील भूमीगत गटार प्रकल्प प्रश्न तातडीने मार्गी लावणार : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुंबईत घेतली भेट


Underground Drainage Project Issue in Varangaon to be Resolved on Priority: Water Resources Minister Girish Mahajan वरणगाव (25 एप्रिल 2026) : 82 कोटी रुपयाची वरणगाव शहरातील भूमिगत गटार प्रकल्प योजना तातडीने मार्गी लावण्यात यावी, अशा प्रकारची मागणी राज्याचे संकट मोचक तथा जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडे मंत्रालया वरणगाव नगराध्यक्षांनी केली होती. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र देऊन वरणगाव शहरातील भूमिगत गटार योजना तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

यावेळी भूमिगत गटार प्रकल्प योजनेचा प्रस्ताव तातडीने टेबलावर फिरून त्रृटी दुरुस्त करून राज्याच्या एसएलटीसीच्या समितीसमोर सादर करण्यात आल्या. आता राज्याची एसएलटीसीची समिती यावर तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे कारण वरणगाव शहरातील रस्ते हे पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमुळे खोदलेले आहेत त्यात भूमिगत पाणीपुरवठा योजना करून जनतेला मूलभूत सुविधा देणे तेवढ्याच महत्त्वाचे आहे. यासाठी वारंवार नवीन रस्ते करून खोदल्यास शासनाचे नुकसान मोठ्या पद्धतीत होईल त्यासाठी आत्ताच भूमिगत गटार प्रकल्प मंजूर होणे हे तातडीची बाब असल्याने राज्य सरकारने तातडीने मार्ग काढून वरणगावकरांना न्याय द्यावा, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना निवेदन देऊन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली.

यावेळी जनसेवक अजमल खान, जनसेवक फजलभाई शेख, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश निमकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !