धक्कादायक : मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत स्व.देशमुखांच्या पत्नीचा पराभव : स्वरुपानंद देशमुख विजयी


Shocking : Late Deshmukh’s Wife Defeated in Massajog Gram Panchayat Election; Swarupanand Deshmukh Emerges Victorious मस्साजोग (29 एप्रिल 2026) : मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला असून प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवला आहे.

अश्विनी देशमुख यांचा पराभव
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुखांच्या निधनानंतर हे सरपंचपद रिक्त झाले होते. या रिक्त जागेसाठी आता पोटनिवडणूक घेण्यात आली. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख स्वतः मैदानात उतरल्याने या निवडणुकीला एक भावनिक किनार प्राप्त झाली होती. मात्र, या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

अश्विनी देशमुख पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान घेण्यात. त्यानंतर आज केज तहसील कार्यालया मतमोजणी प्रक्रिया पार पडली. एकूण तीन फेर्‍यांमध्ये मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासूनच अश्विनी देशमुख या पिछाडीवर होत्या. पहिल्या फेरीत 156 मतांनी, तर दुसर्‍या फेरीत 20 मतांनी स्वरूपानंद देशमुख हे आघाडीवर होते. स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

स्वाभिमानी मतदारांचा विजय : स्वरूपानंद देशमुख
माझ्या गोरगरीब जनतेचा आज विजय झाला आहे. स्वाभिमानी मतदारांचा विजय झालेला आहे. कुणी काय आरोप केले, मला माहीत नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, माझा मतदार राजा माझ्यासोबत आहे. त्यांनी आज मतदानरुपी आशीर्वादातून ते सिद्ध केले आहे. माझ्यावर कुणी काहीही आरोप केले, तरी माझी जनता सुरुवातीपासून माझ्यासोबत होती. हे त्यांनी आज दाखवून दिली असे निकालानंतर स्वरूपानंद देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संतोष देशमुखांसमोर झाला होता पराभव
यापूर्वीही दिवंगत संतोष देशमुख यांच्या विरोधात स्वरुपानंतर यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांचा अवघ्या 9 मतांनी पराभव झाला होता. आज त्यांनी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !