प्रहारच्या विलीनीकरणावर माजी मंत्री बच्चू कडू स्पष्टच म्हणाले ; … तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करणार !
On the merger of Prahar, former Minister Bachchu Kadu stated unequivocally: “…then I will serve as a loyal foot soldier of Eknath Shinde!” मुंबई (29 एप्रिल 2026) : शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांच्या नावाची शिवसेनेकडून चर्चा सुरू असतानाच विधान परिषदेवर जायचे असल्यास प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करावे लागणार असल्याची चर्चा होती. या मुद्यावर प्रथमच माध्यमांसमोर येत बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. नुसत्या आमदारकीसाठी बच्चू कडू जाईल एव्हढा नालायक नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी दिली.
तर शिंदेचा पाईक राहणार
फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करु…पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव महत्वाचे आहे. शेतकरी मजूर आमच्यासाठी आई-वडिलांसारखे आहेत. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले. एक लाखोंक्षा जास्त सदस्य प्रहार संघटनेचे आहे. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली. मी एकमेव माणूस आहे की, मी कुणाला पाठिंबा नव्हता, ना कधी पाठिंबा घेतला. विलीनीकरणाची चर्चा बघितली, वाईट वाटले. बातमीतून बातमी तयार झाली आहे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तरी आम्ही थकलो नाही. भाजपसोबत जाण्याचा निर्णय माझा मतदारांना आवडला नाही. गोतावळा होता, त्यात आम्ही हरलो, असं बच्चू कडूंनी सांगितले.

तर भेटायला जाणार
प्रहारवर अन्याय करण्याची कोणाची हिंमत नाही, कोणाची ताकद नाही. आमची लायकी नाहीये का? पत्रकार परिषदेनंतर फोन आला तर भेटायला जाऊ, अशी प्रतिक्रियाही बच्चू कडू यांनी दिली.विलीनीकरणाबाबत चर्चा तर झाली पाहिजे, मुद्दे काय आहेत ते बघूया…किंतू-परंतू वर कशाला आत्ता बोलायचं. मी चेहर्यावरून आनंदी आहे. कारण नाव माझं कडू आहे, चेहरा कडू राहून कसं चालेल. एकनाथ शिंदे यांना शेतकर्यांच्या मजुराला, दिव्यांगांना जर न्याय द्यायचा असेल, त्यांच्यासाठी काम अजून करायचं असेल तर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घ्यावा, एवढंच मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, असे बच्चू कडू म्हणाले.
