एक्झिट पोलचा दावा : बारामतीत सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य तर राहुरीत अक्षय कर्डिले विजयी होण्याचा अंदाज
Exit Poll Claims: Sunetra Pawar Set for Record-Breaking Lead in Baramati, While Akshay Kardile Predicted to Win in Rahuri बारामती (29 एप्रिल 2026) :बारामती व राहुरीतील पोटनिवडणुकीसाठी 23 रोजी निवडणूक झाल्यानंतर या निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत एक्झीट पोलने अंदाज व्यक्त केला.
बारामतीत सुनेत्रा पवार विजयी होणार !
रिंगसाईड रिसर्च या कंपनीनेने केलेल्या एक्झिट पोलनुसार बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सुनेत्रा पवार यांना अभूतपूर्व असे तब्बल 92 ते 97 टक्के मतदान मिळू शकते आणि ‘त्या’ विक्रम नोंदवतील असा अंदाज रिंगसाईड रिसर्चने वर्तवला आहे.

राहुरीत अक्षय कार्डिले विजयी होणार !
राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कार्डिले हेही चांगल्या मतांनी विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अक्षय कार्डीले यांना 78 ते 83 टक्के मतदान मिळू शकते तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 7 ते 9 टक्के इतके मतदान मिळू शकते, असे रिंगसाईड रिसर्च चा एक्झिट पोल सांगतो आहे..बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी पक्षातर्फे करण्यात आला होता पण या दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकल्या नाहीत. पण या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनाच कौल मिळणार असल्याची शक्यता आहे.
