धुळे पोलीस अधीक्षकपदी सिंगुरी विशाल आनंद तर नंदुरबार अधीक्षकपदी अश्विनी सानप


गणेश वाघ
भुसावळ (30 एप्रिल 2026) : भारतीय व राज्य पोलीस सेवेतील 21 अधिकार्‍यांच्या बदल्या गुरुवार, 30 रोजी शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी केल्या आहेत. धुळे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी सिंगुरी विशाल आनंद तर नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकपदी अश्विनी सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धुळे-नंदुरबारात नवीन अधीक्षक
धुळ्याचे अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची जळगावात बदली झाल्यानंतर धुळ्यात कुणाची नियुक्ती होते? याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या होत्या हा सस्पेन्स आता संपला असून अमरावती ग्रामीण अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांची धुळ्यात नियुक्ती करण्यात आली आहे. सिंगुरी यांनी यापूर्वी नागपूरस्थित नक्षलविरोधी अभियान विशेष कृती गटाचे काम पाहिले आहे शिवाय नोव्हेंबर 2023 ते आजतागायत त्यांनी अमरावती ग्रामीण अधीक्षकपदाची यशस्वी धूरा सांभाळली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात महिला अधीक्षक
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) आणि सहाय्यक पोलीस महानिरीक्षक आस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांच्या जागेवर पुणे लोहमार्ग अधीक्षक अश्विनी सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !