राहता तालुक्यातील बेकायदा गर्भलिंग चाचणी करणार्या टोळीचा पर्दाफाश : एमबीबीएस डॉक्टरांसह 9 आरोपी जाळ्यात
श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची मोठी कारवाई
गणेश वाघ
भुसावळ (30 एप्रिल 2026) : श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने गोपनीय माहितीद्वारे राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारातील निळवंडे कॅनॉल शेजारील खोलीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग चाचणी करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एमबीबीएस डॉ.राहुल आबासाहेब भनगे (34, रा.भानसहिवरे, ता.नेवासा, जि. अहिल्यानगर) व अभिजीत दिलीप भुसाळ (30, रा.पिंपरी निर्मळ, ता.राहाता, जि.अहिल्यानगर) यांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यभराच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या आठ गरोदर महिलांसह पुरूषांना पोलिसांनी अटक केली आहे तर एकूण अटकेतील आरोपींची संख्या नऊ असल्याचे खास सूत्रांनी सांगितले.
24 लाखांचे साहित्य जप्त
लॅपटॉप प्रोब मशीन चार्जरसह, गर्भलिंग तपासणीसाठी लागणारे जेल, टीशु पेपर, चार मोबाईल फोन, कागदी चिठ्ठ्या, एक सिल्वर रंगाची स्विफ्ट कार (एम.एच.12 एच. व्ही. 9436), पांढर्या रंगाची इर्टिगा कार (एम. एच. 14 एच.डब्लु. 8642), लाल रंगाची वॅगनर कार (एम.एच.17 सी.आर 4160) असा एकूण 24 लाख नऊ हजार शंभर रुपये किेंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आठ महिलांसह नातेवाईक व पती ताब्यात
घटनास्थळी आलेल्या आठ महिलांची प्रवरा मेडीकल ट्रस्ट, हॉस्पीटल लोणी येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्या गरोदर असल्याचे आढळुन आल्याने या महिलांचे नातेवाईक /पती यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात लोणी वैद्यकीय अधीक्षक डॉ स्वाती गोपाळराव पवार यांच्या फिर्यादीवरुन लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय युवराज आठरे, आशिष चौधरी, कोमल कुमावत बेबी आण्णा शिंदे, दादासाहेब लोढे, हवालदारी संदीप दरंदले, सचिन धनाड, अशोक गाडे, राजेंद्र बिरदवडे, असीर सय्यद, पो.साईनाथ राशिनकर, सचिन शेवाळे, भोईटे, मनिषा गिरी आदींच्या पथकाने केली.
