मध्यप्रदेशातील जबलपूरात क्रुझ बुडाले : आतापर्यंत सहा मृतदेह हाती

15 हून अधिक बेपत्ताः 18 जणांना वाचवण्यात यश


जबलपूर (30 एप्रिल 2026) :एमपी टुरीझमच्या क्रुझमध्ये 40 ते 45 प्रवाशांना घेवून निघालेले क्रुझ गुरुवारी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नर्मदा नदीवरील बरगी धरणात उलटले. या अपघाताने मोठी खळबळ उडाली असून आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. 18 जणांना सुखरूप वाचवण्यात आले असून 15 हून अधिक जण अद्याप बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बरगी शहराचे पोलीस अधीक्षक अंजुल मिश्रा यांनी सांगितले की, एमपी टुरिझमच्या क्रूझमध्ये 40 ते 45 जण होते. अचानक आलेल्या वादळामुळे हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच, एसडीआरएफचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अंधारामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. मात्र मोठ्या टॉर्चच्या साहाय्याने लोकांचा शोध घेतला जात आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !