उत्कंठा संपली : बारावी परीक्षेचा उद्या निकाल
12th Grade Exam Results Tomorrow मुंबई (1 मे 2026) : बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार? याबाबत उत्कंठा संपली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवार, 2 मे 2026 जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ.दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
उद्या सकाळी पत्रकार परिषद
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकालबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात विशेष पत्रकार परिषद होत आहे. या परिषदेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा एकत्रीत निकाल जाहीर केला जाईल.

असा पाहता येणार निकाल
विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in , hscresult.mkcl.org , mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळवर भेट देऊ शकतात. निकालाची लिंक दुपारी एक वाजल्यापासून सक्रिय होईल. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सचाच वापर करावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

