विवाह समारंभात हातमजुरी करणार्‍या कुटुंबाने बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यासाठी घेतला पुढाकार


भुसावळ (2 मे 2026) : जळगाव जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान जागृतीसाठी हातमजुरी रंगकाम करणार्‍या सुनील गोडघे कुटुंबाने आपल्या उच्च शिक्षित मुलीच्या विवाह समारंभाची पत्रिका आणि बॅनरद्वारे बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात पुढाकार घेतला. अ‍ॅक्सेस टु जस्टिस, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प समन्वयक सुनील जगन हिवाळे व दीपाली सुनील हिवाळे यांनी या कुटुंबीयास मार्गदर्शन केले.

या अनोख्या विवाह सोहळ्यात प्रशासन अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. इतरांनी सुद्धा अनुकरण करावा असे आवाहन घोडगे, भालेराव कुटुंबाने आणि धर्मगुरु प्रा.प्रकाश मोरे, शैलेंद्र जाधव यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !