भुसावळातील हिंदी महाविद्यालयात महाराष्ट्र दिवस उत्साहात साजरा


भुसावळ (2 मे 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्राच्या प्रगतीचा व अभिमानाचा दिवस
यानंतर महाराष्ट्र गीत म्हणून सर्वांनी मानवंदना दिली. प्रसंगी सर्व प्राध्यापकांनी झेंड्याला सलामी देऊन अभिवादन केले. कार्यक्रमात आपले विचार प्रस्तुत करताना डॉ.रमेश जोशी यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा व अभिमानाचा हा दिवस आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा गौरव म्हणून हा दिवस साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, प्रा.अनुपम शर्मा, प्रा.हितेश गुप्ता, प्रा.ज्योती ओस्तवाल, बद्री प्रसाद केवट, कोमल भट आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !