भुसावळाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अपात्र : सत्याचा विजय झाल्याचा पदाधिकार्‍यांचा दावा


गणेश वाघ
Bhusawal’s Directly Elected Council President Disqualified: Office-bearers Claim Victory for the Truth भुसावळ (5 मे 2026) : भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्याकडील जातप्रमाणपत्र वैध नसल्याच्या कारणाने त्यांना शासनाने अपात्र केले आहे. या निर्णयाने भुसावळच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात भुसावळात या अनुषंगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचा अंदाज असून शासनाने दिलेल्या निर्णयाचे पदाधिकार्‍यांनी स्वागत करीत हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. संबंधितानी शासनाची दिशाभूल करीत कागदपत्रे सादर केली मात्र तपासणीत सर्व गैरप्रकार उघड झाल्याचा दावा पदाधिकार्‍यांनी यावेळी केला.

सत्याचा विजय झाला : रजनी संजय सावकारे
हा सत्याचा व संविधानाचा विजय आहे. मुळात गायत्री-गौर यांच्या घरात त्यांच्या भावाचे जात प्रमाणपत्र (व्हॅलिडीटी) समितीने दोन वर्षांपूर्वी नाकारले होते मात्र त्यानंतरही संबंधितांनी जनता व शासनाची दिशाभूल केली. आपला न्यायदेवतेवर विश्वास होता, असे भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे म्हणाल्या.



शासनाचा निर्णय स्वागतार्ह : विनोद सोनवणे
भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून त्यांना अपात्र करण्याचा शासनाचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. हा केवळ प्रशासकीय आदेश नसून अनुसूचित जातीच्या हक्कावर डल्ला मारणार्‍या प्रवृत्तींना मिळालेली चपराक असल्याचे रिपब्लिकन सेनेचे
जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले.

आरक्षणाचा लाभ घेणार्‍यांना कायद्याची चपराक : राहुल तायडे
भुसावळ पालिका निवडणुकीत नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर यांनी जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांद्वारे मिळवले होते. या संदर्भात जात पडताळणी समितीकडे पुराव्यानिशी तक्रार केली व शासनाचा दिलेला निर्णय म्हणजे हा सत्याचा विजय आहे. आरक्षणाचा लाभ घेणार्‍यांसाठी कायद्याने दिलेली मोठी चपराक असून एखाद्या अधिकार्‍याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र दिले असल्यास त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे भुसावळातील भाजपा अनुसूचित जाती मोर्चा माजी शहराध्यक्ष राहुल तायडे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !