नरसापूर येथील चिमुकलीवरील अत्याचाराचा निषेध : ब्राम्हण संघातर्फे प्रशासनाला निवेदन


Condemnation of the Atrocity Against a Young Girl in Narsapur: Memorandum Submitted to the Administration by the Brahmin Association भुसावळ (5 मे 2026) : पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा ब्राह्मण संघातर्फे निषेध करण्यात आला व आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कायदे अधिक कठोर होण्याची अपेक्षा
ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर म्हणाले की, अशा नराधमांनी समाजाच्या सहिष्णुतेचा अंत पाहू नये. शासनाने महिला व बालकल्याण संदर्भातील कायदे अधिक कडक करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी.



यांची होती उपस्थिती
या आंदोलनात संघाचे उपाध्यक्ष गजानन जोशी, कल्पना दामले, रामभाऊ गचके, माधवपूरकर, डॉ.दावलभक्त, गाडगीळ, जयप्रकाश शुक्ला, कैलास उपाध्याय, रमाशंकर दुबे, रमेश जोशी, जोशी तसेच असंख्य समाजबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !