लुप्तप्राय मैदांनी खेळांना स्पर्धेमुळे नवी उभारी : डीवायएसपी अनिल बडगुजर
यावलला स्वराज्य चषक नाईट क्रिकेट स्पर्धेचे बस वितरण
यावल (5 मे 2026) : यावल शहरात बस स्थानकालगत मैदानावर स्वराज्य चषक नाईट क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन, त्यातच युट्युब लाईव्ह आणि मैदानावर लावण्यात आलेली स्क्रीनमुळे ग्रामीण भागातील लुप्त पावत चाललेले मैदानी खेळ पुन्हा पुनर्जीवित झाले आहे. व मैदानाकडे तरुण वळू लागले आहे. अशा खेळाचे आयोजन नेहमीच झाले पाहिजे, असे प्रतिपादन डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी केले ते यावल येथे आयोजित स्वराज्य चषक नाईट क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस एकता क्रिकेट संघ व द्वितीय बक्षीस शिवशक्ती संघ आणि तृतीय बक्षिस राजमुद्रा क्रिकेट संघाला मिळाले आहे.
यांचा स्पर्धेत सहभाग
यावल शहराच्या इतिहासात प्रथमच बसस्थानकालगत असलेल्या मैदानावर नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युट्युब लाईव्हच्या माध्यमातून सदर स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, त्याचप्रमाणे मैदानावर भली मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सामन्यांमुळे शहरात रंगत निर्माण झाली होती तर या स्पर्धेमध्ये राजकीय पदाधिकारी, पोलीस, महसूल, पत्रकारासह विविध संघाचा सहभाग होता.


शेखर पटेल यांचा बक्षिसाने गौरव
या स्पर्धेचे प्रथम बक्षीस एकता संघाचे कर्णधार शेखर पटेल यांना डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्याहस्ते देण्यात आले. द्वितीय बक्षीस शिवशक्ती संघाचे कर्णधार सुनील गावडे यांना जिल्हा परिषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे तर तृतीय बक्षीस राजमुद्रा संघाचे कर्णधार राहुल सुतार यांना डॉ.कुंदन फेगडे यांच्याहस्ते देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या बक्षीस वितरण समारंभात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, स्वामी पाटील, नगरसेवक उमेश फेगडे, योगेश चौधरी, यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन सह मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालक जावेद शेख तथा स्पर्धेत समालोचक म्हणून कामकाज केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणारे शकील तडवी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. या मैदानाचे रात्री सुरू असलेल्या सामन्याप्रसंगी ड्रोनव्दारे काढलेल्या भव्य अशा छायाचित्र एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांना भेट देण्यात आले. तसेच पुढारी संघाचे कर्णधार कदीर खान, पोलीस संघाचे कर्णधार सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, महसूल संघाचे कर्णधार अमित राऊत यांना स्मृती चषक देऊन सन्मानित करण्यात आले
स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू
या स्पर्धेतील मालिकावीर म्हणून शिवशक्ती संघाचा प्रणव जोशी ठरला तर उत्कृष्ट फलंदाज एकता संघाचा बंटी धनगर ठरला. उत्कृष्ट गोलंदाज एकता संघाचा अय्युब तडवी ठरला तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक महसूल संघाचा सागर तायडे ठरला. मॅन ऑफ द मॅच मध्ये राहुल सोनवणे, महेंद्र माळी, सागर कोळी, कल्पेश गावडे, बंटी धनगर, बंटी पाटील, पवन अडकमोल, प्रणव जोशी हे खेळाडू ठरले होते तर उत्कृष्ट कर्णधार म्हणुन वेदांत सराफ यांना गौरवण्यात आले.
नगरपालिकेचे हक्काचे मैदान होणार
सध्या खेळाडू हे बस स्थानकाच्या मैदानावर नाममात्र फी भरून खेळत आहे. मात्र, लवकरच नगर परिषदेच्या क्रीडा संकुलाचे काम सुरू होईल मैदानाच्या जागेचे मोजमाप करून जागा ताब्यात घेतली जाईल तेथे क्रिकेटसह हॉलीबॉल, बॅडमिंटन आदी खेळांसाठीच्या सुविधा उपलब्ध केल्या जातील. या क्रिडा संकुला करीता नगर परिषदेकडून चार कोटी रुपयांची भरीव तरतूद केल्याची माहिती या प्रसंगी नगराध्यक्ष यांच्यावतीने देण्यात आली.े