वरणगाव पालिकेत पाणीपुरवठा योजनेचा नगराध्यक्षांनी घेतला आढावा

पाणीपुरवठा सुरळीत करा : नगराध्यक्ष सुनील काळे यांची एमजेपी कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी


The Municipal President reviewed the water supply scheme at the Varangaon Municipality वरणगाव (6 मे 2026) : नवीन वरणगाव पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक बुधवार, 6 मे रोजी नगरपरिषद मध्ये नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मोहन आव्हाड, उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

नगराध्यक्षांकडून योजनेचा आढावा
यावेळी वरणगाव शहरात 2019 ला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेचे काम जवळ-जवळ पूर्ण होत आलेले आहे त्या योजनेच्या प्रगतीचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी योजनेचे 90 टक्के काम झाले आहे, काही राहिले आहे ते पूर्ण करून राहिलेले वाढीव पाणीपुरवठा योजनेत घेण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्याचे ठरले तसेच या योजनेचे काम पूर्ण झाले आहे.



मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार योजनेचे लोकार्पण
या नवीन पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे. त्याचा आढावा सुद्धा यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी घेतला.

वरणगावकरांना 24 तास पाणी देण्यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तातडीने तयार करून मंजुरीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर पवार, सभापती निलेश खाचणे, नगरसेवक निलेश उर्फ नाना चौधरी, माला मेढे, श्रद्धा गायकवाड, मनिषा माळी, माधुरी हळदे, वृषाली चौधरी, सय्यद इरफान अशपाक शाह, वंदना पाटील, तृप्ती महाजन, भाग्यश्री सोनवणे, शबनम बी.मिर्झा, इरफान खाटीक, शुभम जावळे, राजेंद्र चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !