नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कारवाई : गुजरातला निघालेली 26 लाखांची अवैध दारू जप्त
अवैध दारू तस्करी पुन्हा ऐरणीवर ः तस्करांकडून दरवेळा पुष्पा स्टाईल होतेय वाहतूक
गणेश वाघ
Major Operation by Nandurbar Crime Branch : Illegal Liquor Worth ₹26 Lakhs, Bound for Gujarat, Seized नंदुरबार (7 मे 2026) : नंदुरबार गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे एका वाहनातून तब्बल 26 लाख रुपये किंमतीची अवैध दारु जप्त केली आहे. ही दारू गुजरातमध्ये चोरट्या मार्गाने नेली जात असताना कारवाई करण्यात आली. शिवाजी बाबुलाल चौधरी (29, बेटावद, ता.शिंदखेडा, जि.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना चोरट्या मार्गाने अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने पथकाने 7 रोजी सापळा रचला. नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा-धनराट रोडवर संशयास्पद वाहन (एम.एच.06 बी.डब्ल्यू.4454) आल्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर त्यात रॉयल ब्लू कंपनीच्या दारुचे 198 खोके आढळल्याने ते जप्त करण्यात आले.


यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार जितेंद्र तांबोळी, बापू बागुल, जितेंद्र तोरवणे, नितीन गांगुडे आदींच्या पथकाने केली.
