निकालाची परंपरा कायम : भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के


Tradition of Excellence Continues : Biyani Military School in Bhusawal Achieves 100% Result in Class 10 भुसावळ (8 मे 2026) : नाशिक विभागीय मंडळाचा एसएससी मार्च 2026 चा निकाल शुक्रवार, 8 मे रोजी ऑनलाईन घोषित झाला. या परीक्षेत बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले. यात पार्थ नितीन कोल्हे या विद्यार्थ्याने 92.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर श्याम साहेबराऊव पाटील या विद्यार्थ्याने 91.00% गुण मिळवून द्वितीय तसेच प्रणित किशोर चौधरी या विद्यार्थ्याने 90.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

या निकालाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शाळेचे अनेक विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी,प्राचार्य डी एम पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा दिल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !