जळगावातील महादेव हॉस्पीटलमध्ये हृदयरोग तपासणी व उपचार मोफत
जळगाव (11 मे 2026) : उन्हाळयात हदयविकाराचा धोका अधिक असतो आणि हृदयविकारावरील उपचाराचा खर्चदेखील अफाट असल्या कारणारे येथील महादेव हॉस्पिटलमध्ये आजपासून हदयरोग तपासणी शिबिरास प्रारंभ झाला असून आता हृदयरोग तपासणी व उपचार मोफत केले जाणार आहे.
मोफत हदयरोग तपासणी शिबिर
जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या महादेव हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळयात हदयविकाराचा त्रास अनेक रुग्णांना जाणवत असतो पण अफाट खर्चामूळे या कडे दुर्लक्ष केले जात असल्याने रुग्णालयाने जाहीर केल्यानुसार, मोफत हदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयरोग तपासणी, इसीजी आणि 2डी इको तपासणी पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. योजनेअंतर्गत हृदयाची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी आणि पेसमेकर यांसारख्या अत्याधुनिक सुविधा मोफत उपलब्ध आहेत.यासाठी तज्ञांची टीम तैनात करण्यात आली आहे.
कार्डिओलॉजी विभागात डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. जिशा सैय्यद, डॉ. सिधेश्वर खांडे आणि डॉ. मनमिता रेड्डी यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत रुग्णालयात हे तज्ञ तपासणी करतील व रुग्णालय 24 तास आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध आहे. या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडे रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी) आधार कार्ड आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी नागरिकांनी 9112030055 किंवा 9112040055 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालयामार्फत करण्यात आले आहे.
तर ताबडतोब दवाखान्यात दाखल व्हा : डॉ.खांडे
घामामुळे शरीरातील पाणी व खनिजे कमी होतात, ज्यामुळे रक्तदाब असंतुलित होतो. हृदयावर अतिरिक्त ताण पडतो. डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होते आणि नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. यामुळे छातीत तीव्र वेदना, जडपणा किंवा अस्वस्थता (सामान्यतः गॅस किंवा सिडिटी समजून दुर्लक्षित केली जाते) बसल्या जागी किंवा वातानुकूलित खोलीत असतानाही अचानक खूप थंड घाम येणे चक्कर येणे किंवा डोळ्यासमोर अचानक अंधारी येणे डाव्या हातामध्ये, खांद्यात, किंवा जबड्यात वेदना होणे कोणतेही कष्टाचे काम न करता अचानक श्वास कोंडणे इ लक्षणे जाणवल्यास ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हावे, असे डॉ.सिधेश्वर खांडे म्हणाले.
