भुसावळात कुत्र्यांनी घेतला बालकाचा बळी : दोषीवर हवी कठोर कारवाई


Dogs Claim Child’s Life in Bhusawal: Strict Action Demanded Against the Guilty भुसावळ (13 मे 2026) : शहरातील नारायण नगरात 24 एप्रिल रोजी शाळेत जाणार्‍या तारकेश विजय झोपे (10) या बालकावर कुत्र्यांनी हल्ला केला व या तो गंभीर जखमी झाल्यानंतर आधी जळगावात व नंतर रॅबीजची लक्षणे आढळताचत त्यास सोमवार, 19 रोजी मुंबईत हलवण्यात आले मात्र मुंबईत त्याची प्राणज्योत मालवली. दरम्या, या प्रकारानंतर संतप्त रहिवाशांनी रात्री संबंधित कुत्रे बाळगणार्‍याविरोधात संताप व्यक्त करीत त्याच्या घरासमोर ठिय्या मांडला.

अचानक केला कुत्र्यांनी हल्ला
तारकेश्वर हा 24 एप्रिल रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर निघाला व रिक्षाची प्रतीक्षा करत असतानाच परिसरातील तीन चार कुत्र्यांनी तारकेश्वर अचानक हल्ला चढवला, त्यात तारकेशचा डोळा, हनुवटी, गाल, नाकपुडीचे लचके तोडले. या बालकावर जळगावात तब्बल 30 टाके घेवून उपचार करण्यात आले होते. नंतर त्याला डिस्चार्ज मिळाला मात्र दोन दिवसात त्याची प्रकृती बिघडली. रेबीजचे लक्षणे दिसू लागल्याने त्याला सोमवारी मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटल या डॉग बाइटच्या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू होऊन पाच तासांचा कालावधी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.







मोर्चे, आंदोलने पण परिणाम शून्य
श्वानदंश व भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नी राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी अनेकदा निवेदने दिली. 24 एप्रिलच्या घटनेनंतर मनसेचे शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांनी निवेदन दिले. 25 रोजी अलका मराठे यांच्या नेतृत्वात नारायण नगरातील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला पण, पालिका प्रशासनासोबतच सत्ताधारी विरोधक असंवेदनशील असल्याने उपाययोजना झाली नाही. दरम्यान, दोषी असलेल्या कुत्र्याच्या मालकावर आता गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !