झारखंडातील विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ भुसावळात अभाविपचे आंदोलन


भुसावळ (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : झारखंड लोकसेवा आयोग, झारखंड कर्मचारी निवड आयोग तसेच इतर परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी झारखंडमधील विद्यार्थी मागील अनेक दिवसांपासून लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत आहेत. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) भुसावळ शाखेतर्फे गुरुवार, 13 ऑगस्ट रोजी शहरातील पु.ओं.नाहाटा चौफुली परिसरात निषेध प्रदर्शन करण्यात आले.

लाठी हल्ल्याचा केला निषेध
यावेळी अभाविप कार्यकर्त्यांनी पेपरफुटीची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध, विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे बंद करा अशा घोषणा देत झारखंड सरकारच्या कारवाईचा जाहीर निषेध केला.






विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे चुकीचे : देवेंद्र गोसावी
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या शिक्षण, परीक्षा आणि भवितव्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करणे हा त्यांचा लोकशाही अधिकार आहे. या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर करणे हा विद्यार्थ्यांच्या आवाजाचा अवमान आहे, असे अभाविपचे शहर मंत्री देवेंद्र गोसावी यांनी सांगितले.

यांचा आंदोलनात सहभाग
या निषेध प्रदर्शनात अभाविपचे प्रदेश मेडिव्हिन संयोजक ललित सोनार, जळगाव विभाग संयोजक गायत्री पाटील, भुसावळ जिल्हा सहसंयोजक अथर्व जंगले, शहरमंत्री देवेंद्र गोसावी, सहमंत्री महेंद्र ठाकुर, योजना कुरकुरे, नयन सोनवणे, श्रद्धा सोनवणे यांच्यासह अभाविपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !