यावल नगरपरिषदेवर पाणीटंचाई संदर्भात भाजपाचा मोर्चा

सत्ताधारी गट दुजाभाव करत असल्याची तक्रार : भाजपा नगरसेवकांचा प्रशासकीय अधिकार्‍यांवर टक्केवारीचा आरोप


यावल (14 मे 2026)  यावल नगरपरिषदेवर भाजपा गटनेता नंदा राजेंद्र महाजन यांच्या नेतृत्वात शहरातील देशमुख वॉर्डासह वार्ड क्रमांक 10 व 11 मधील मोठ्या संख्येतील महिलांनी एकत्र येऊन मोर्चा नेला. या प्रभागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सत्ताधारी गटाकडून विरोधकांच्या वार्डाबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अनियमित होणार्‍या पाणीपुरवठ्याबाबत नागरीक संतप्त झाले. भाजपा नगरसेवकांनी नगरपालिका प्रशासनावर टक्केवारी घेऊन काम करीत असल्याचा गंभीर आरोप केला. नगराध्यक्ष बाहेरगावी असल्याचे सांगून मुख्याधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारले.

पालिकेवर निघाला मोर्चा
शहरातील देशमुखवाडा भागात वॉर्ड क्रमांक 10 व 11 मधील पाण्याची समस्या, अस्वच्छतेची समस्या घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नगरपरिषदेच्या गटनेता नंदा राजेंद्र महाजन यांनी महिलांना घेऊन गुरुवारी यावल नगरपरिषेदवर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये भाजपा नगरसेविका सविता विजय नन्नवरे, शुभांगी रोशन येवले, नगरसेवक हेमराज फेगडे, योगेश चौधरी, कदीर खान, आकाश चोपडे आदींचा सहभाग होता. बारा वाजता हा मोर्चा नगरपालिकेत धडकला आणि थेट मुख्याधिकार्‍यांच्या दालनात जाऊन त्यांना पाणीटंचाई संदर्भात जाब विचारण्यात आला.







विस्कळीत पाणीपुरवठ्याने संताप
मुख्याधिकारी निशिकांत गवई, पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील, कर निरिक्षक संभाजी कोल्हे, दादु धोत्रे सह आदींनी मोर्चेकरींना पाणीपुरवठा का विस्कळीत झाला आहे याची यासंदर्भात उत्तर दिले. मात्र सत्ताधारी गट हा विरोधकांशी दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कमी दाबाने पाणी पुरवठा करणे व नियमित वेळेवर पाणी पुरवठा जर होत नसेल तर आपण शहरात दवंडी का दिली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !