हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस गाडीचा उद्यापासून शुभारंभ


भुसावळ (18 मे 2026) : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून हजूर साहिब नांदेड आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई दरम्यान नवीन साप्ताहिक मेल/एक्सप्रेस गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, नियमित व आरामदायी सेवा उपलब्ध होणार आहे. ही गाडी पुढीलप्रमाणे चालविण्यात येणार आहे :

असे आहे वेळापत्रक
हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी गाडी क्रमांक 07667 मंगळवार, 19 मे रोजी हजूर साहिब नांदेड येथून चार वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 7.50 वाजता पोहचेल. या गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगांव, मनमाड, नाशिक रोड, कल्याणला थांबा देण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-हजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष एकेरी गाडी
गाडी क्रमांक 07813 विशेष एकेरी गाडी 20 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 12 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी हजूर साहिब नांदेड येथे 11.50 वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजी नगर, जालना, परतूर, परभणी आणि पूर्णा स्थानकावर थांबा असेल.

गाडी क्रमांक 17667/17668 हजूर साहिब नांदेड- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस

गाडी क्रमांक 17667 हजूर साहिब नांदेड- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक 20 मे पासून प्रत्येक बुधवारी हजूर साहिब नांदेड येथून 9.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एक वाजता वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस दिनांक 20 मे पासून प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 4.55 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी हजूर साहिब नांदेड येथे 9.10 वाजता पोहोचेल. या गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला – 10 शयनयान, 6 वातानुकूलित 3-टियर, 2 वातानुकूलित 2-टियर, 4 सामान्य श्रेणी तसेच 2 एसएलआर डबे असतील.

गाडी क्रमांक 17665/17666 हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस
गाडी क्रमांक 17665 हजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 25 मे 2026 पासून प्रत्येक सोमवारी हजूर साहिब नांदेड येथून 9.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 1.40 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस 26 मे 2026 पासून प्रत्येक मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 4.35 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी हजूर साहिब नांदेड येथे 9.10 वाजता पोहोचेल.

या गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगांव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण स्थानकावर थांबा असेल. या गाडीला सहा शयनयान, सहा वातानुकूलित 3-टियर, 2 वातानुकूलित 2-टियर, 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी, 4 सामान्य श्रेणी, 1 पॅन्ट्रीकार तसेच 2 पॉवरकार डबे असतील


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !