रास्त भाव धान्य दुकानदारांचे सहा महिन्यांचे थकीत कमिशन त्वरित द्या : नाशिक विभागीय आयुक्तांना निवेदन


Immediately Release Six Months of Pending Commission for Fair Price Shopkeepers: Memorandum Submitted to the Nashik Divisional Commissioner भुसावळ (19 मे 2026) : भुसावळ तालुक्यातील रास्त भाव धन्य दुकानदारांचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे सुमारे एक कोटींपेक्षा अधिक कमिशन थकले असून दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या संदर्भात नाशिक विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

काय आहे मागण्या ?
भुसावळ तालुक्यात एकूण 130 रास्त भाव धान्य दुकाने असून जे शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून नागरिकांना रास्त भाव दरात धान्य पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात मात्र गेल्या सहा महिन्यांपासून कमिशन न मिळाल्याने या सर्व दुकानदारांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. यामुळे घर खर्च कर्मचार्‍यांचे वेतन दुकानाचे भाडे आणि इतर दैनंदिन खर्च भागवणे दुकानदारांना कठीण झाले आहे. दुकानदारांना प्रत्येक महिन्याला कमिशन मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.




यांची होती उपस्थिती
या संदर्भातील निवेदन नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाचे सहाय्यक पुरवठा अधिकारी स्मिता दळवी यांना रेशन दुकानदार संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास उपाध्याय, सुनील अंभोरे, जिल्हा सचिव भागवत पाटील, राज्य उपाध्यक्ष नमा शर्मा, आरिफ मिर्झा, टीना धांडे, सी.आर.पाटील, पंकज पाटील, ईश्वर पवार, यशवंत बनसोडे, राजेश सैनी, उल्हास भारसके, संतोष साळवे, विजय मेढे, शांताराम इंगळे आदींची उपस्थिती होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !