भुसावळात तापी कॉलनी भागात रेल्वेची मोठी कारवाई : रेल्वे जमिनीवरील अतिक्रमणावर फिरवला ‘बुलडोझर’

तात्पुरती बांधकामे, गोडाऊन शेडसह 140 मीटरच्या सीमाभिंती जमीनदोस्त


Major Railway Operation in Bhusawa l: ‘Bulldozer’ Action Against Encroachments on Railway Land along the 40-Foot Road in the Tapi Colony Area. भुसावळ (23 मे 2026) : भुसावळ विभागातील रेल्वे प्रशासनाने रेल्वे जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात एक मोठी आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील तापी कॉलनी भागातील 40 फूट रोड आणि रेल्वेच्या मोकळ्या जमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बलाच्या कडक बंदोबस्तात यशस्वीरित्या हटवले. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणार्‍या या परिसरात रेल्वेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले होते मात्र कडेकोट बंदोबस्तामुळे ही कारवाई 15 ते 20 मेपर्यत कोणताही अनुचित प्रकार न घडता पूर्णपणे शांततेत पार पडली.

मोठी बांधकामे जमीनदोस्त
रेल्वे प्रशासनाने केलेल्या पाहणीत असे समोर आले होते की, या परिसरातील मुख्य कायमस्वरूपी इमारती जरी रेल्वेच्या हद्दीबाहेर असल्या,तरी काही व्यावसायिक आणि अतिक्रमणकर्त्यांनी रेल्वेच्या मालकीच्या जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता.या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाची बांधकामे, मोठी शेड्स आणि कंपाउंड वॉल (सीमा
भिंती) उभारण्यात आल्या होत्या.




हटविण्यात आलेल्या अतिक्रमणाचा तपशील
मोहीमेदरम्यान रेल्वेच्या पथकाने अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. यात सात तात्पुरती बांधकामे काढली. यामध्ये प्रामुख्याने दोन मोठ्या तात्पुरत्या संरचनांचा (स्ट्रक्चर्स) समावेश होता, जे पूर्णपणे हटवण्यात आले. भव्य गोडाऊन शेड,व्यावसायिक वापरासाठी रेल्वेच्या जागेवर अंदाजे 40 मीटर बाय 9 मीटर आकाराचे उभारलेले एक मोठे गोडाऊन शेड जमीनदोस्त करण्यात आले. 140 मीटर लांबीच्या सीमाभिंती काढत वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे जमिनीला वेढा घालणार्‍या एकूण 140 मीटर लांबीच्या कंपाउंड/सीमाभिंती पाडण्यात आल्या.

रेल्वे अधिकारी, आरपीएफ जवानांचा ताफा तैनात
या धडक मोहिमेदरम्यान रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणत्याही संभाव्य विरोधाला तोंड देण्यासाठी आरपीएफचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाने आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करत काही तासांतच संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त केला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !