अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम उपस्थित असलेल्या व्हाईट हाऊसजवळ गोळीबार : सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरात संशयीत ठार


वॉशिंग्टन डीसी (24 मे 2026) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या व्हाईट हाऊसजवळ एका संशयीताने तब्बल 30 गोळ्या झाडल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे प्रत्युत्तरादाखल कारवाईत संशयित हल्लेखोराला गोळी लागली व रुग्णालयात नेल्यावर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गोळीबारात एक सामान्य नागरिकही गोळी लागून जखमी झाला.

गोळीबारानंतर प्रचंड गोंधळ
गोळीबारानंतर व्हाईट हाऊस परिसरात गोंधळ उडाला. तेथे उपस्थित पत्रकार आणि कर्मचार्‍यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सीक्रेट सर्व्हिस एजंट्स शस्त्रांसह संपूर्ण परिसरात तैनात झाले आणि सुमारे 40 मिनिटे लॉकडाऊनसारखी परिस्थिती राहिली. एफबीआय, सिक्रेट सर्व्हिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी परिसर वेढला आणि तपास सुरू केला. व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्समधील नॉर्थ लॉन रिकामा करण्यात आला आहे. एफबीआय संचालक काश पटेल यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, सुरक्षा यंत्रणा गोळीबाराच्या बातमीवर कारवाई करत आहेत.




व्हाईट हाऊसपासून एक ब्लॉक दूर गोळीबार
सिक्रेट सर्व्हिसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द वर सांगितले की त्यांना गोळीबाराची माहिती मिळाली होती. हा परिसर व्हाईट हाऊसपासून सुमारे एक ब्लॉक दूर आहे. एजन्सीने सांगितले की, घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचारी माहितीची पुष्टी करण्यात व्यस्त आहेत.

वॉशिंग्टनच्या मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाकडून घटनेवर तात्काळ कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नाही. सध्या सुरक्षा यंत्रणा संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

वॉशिंग्टनमध्ये डिनरदरम्यान गोळीबार : ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढले
यापूर्वी वॉशिंग्टन डीसीमध्ये वार्षिक व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट डिनरदरम्यानही गोळीबार झाला होता. कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्यासह अनेक मोठे अधिकारी उपस्थित होते. न्यूज एजन्सी एपीनुसार हल्लेखोराने हॉटेलच्या बॉलरूमबाहेर गोळीबार केला होता. ट्रम्प आणि पाहुणे बॉलरूममध्ये होते. हल्ल्याच्या सुमारे दीड तासानंतर ट्रम्प यांनी माध्यमांना संबोधित केले होते. ते म्हणाले- अमेरिकेच्या संविधानावर हल्ला झाला. सीक्रेट सर्व्हिसने माझा जीव वाचवला. सुरक्षा कर्मचार्‍यांनी शौर्याने काम केले. ज्या अधिकार्‍याला गोळी लागली, तो सुरक्षित आहे. त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. हल्लेखोराजवळ शक्तिशाली बंदूक होती.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !