भुसावळातील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांचा लोणावळ्यात ‘फेलो ऑफ द कलर सोसायटी अ‍ॅवॉर्ड’ने गौरव


भुसावळ (24 मे 2026) : भुसावळ शहरातील नामांकीत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष व के.नारखेडे कॉम्प्युटर टेक्नोलॉजी संस्थेचे अध्यक्ष व रंग तंत्रज्ञान क्षेत्रातील किमयागार डॉ.मकरंद नारखेडे यांचा दि कलर सोसायटी मुंबईतर्फे ‘फेलो ऑफ द कलर सोसायटी अ‍ॅवॉर्ड’ने गौरव करण्यात आला. रंग तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार नारखेडे यांना लोणावळा येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
गुरुवार, 21 मे 2026 रोजी लोणावळा येथे झालेल्या कार्यक्रमात एशियन पेंट कंपनीचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट राजीव गोयल, डॉ.प्रकाश महानवर, ऑनररी जॉ.सेक्रेटरी राजीव दोंडुगडे, डॉ.प्रशांत सामंत, संदीप बिंद्रा, अर्चना नारखेडे, भाग्येश नारखेडे तसेच प्रथितयश उद्योगपतींची या कार्यक्रमास उपस्थिती होती.




पुरस्कारानंतर शुभेच्छांचा वर्षाव
विशेष बाब म्हणजे डॉ.मकरंद नारखेडे यांचे पिताश्री कै.दादासाहेब एन.के.नारखेडे यांना सुद्धा 2005 या वर्षी ‘लाईफ टाईम अचिवमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ.मकरंद नारखेडे यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्था सदस्य विकास पाचपांडे, ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल, संगणक विभागप्रमुख बी.ए. पाटील, पर्यवेक्षक सुनील पाठक, सुनील राणे, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक बी.बी.जोगी, मंगेश पाटील, तसेच संगणक विभाग सहित विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी डॉ.मकरंद नारखेडे साहेब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !