प्रगनकांना जनगणना नोंदणीसाठी सहकार्य करा : यावल नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी यांचे आवाहन
यावल (24 मे 2026) : यावल नगरपरिषदेच्या वतीने शहरात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास सुरवात होत आहे. या पहिल्या टप्प्यात नागरीकांना प्रगणकांना सहकार्य करावे, आपापल्या कुटुंबाची योग्य व व्यवस्थित माहिती द्यावी, असे आवाहन यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील व मुख्याधिकारी निशीकांत गवई यांनी केले आहे.
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ
यावल नगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ झाला आहे. शहतरा विविध भागात जनगणने कामी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. व पहिल्या टप्प्याच्या मोहिमेसाठी यावल नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या मार्गदर्शना खाली जनगणना टीम यावल शहरात प्रत्यक्षात काम सुरू केले आहे. सदरचे काम 16 मे 26 पासून सुरू झालेली असून हे काम 14 जून 26 या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी विविध माहिती संकलित करण्यासाठी प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचार्याला आपापल्या घरी आल्यानंतर योग्य माहिती पुरवावी व प्रशासनाला सहकार्य करावे एखादी इसमाचे घर बंद असते यावेळी असे प्रगणक आमच्याकडे आलेले नाही अशा तक्रारी होतात त्यासाठी एखादी ची जनगणना न झाल्यास किंवा नजरचुकीने राहिल्यास या कालावधीत नगरपालिकेत प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी व जनगणना करून घ्यावी असे आवाहन नगरपालिका नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील व मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी केले आहे.



नगराध्यक्षांचे आवाहन
यावल नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांनी जनगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करावे व जनगणना हे आपल्या देशाचे भविष्य असून सर्व नागरिकांनी त्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.नागरीकांना बिनचुक व योग्य माहिती द्यावी तसेच आप आपल्या जनजणनेच्या नोंद योग्य व्हायला हव्या याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.







