इंधन संकटात आता दरवाढीचा मार : महिनाभरात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले
मुंबईत पेट्रोल 2.72 आणि डिझेल 2.81 प्रति लिटरने महाग ; इराण युद्धाचा परिणाम
Now the Blow of Price Hikes Amidst the Fuel Crisis: Petrol and Diesel Become Costlier for the Fourth Time in a Month नवी दिल्ली (25 मे 2026) : राज्यात एकीकडे इंधनाच्या टंचाईमुळे पेट्रोल पंपावर कुठे रांगा तर कुठे हाणामारीच्या घटना घडत असताना दुसरीकडे महिनाभरात सलग चौथ्यांदा इंधन दरात वाढ करण्यात आल्याने जनतेतून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आधीच दरवाढीने जनता हैराण असताना आता नव्याने सोमवार, 25 मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल 2.61 प्रति लिटर आणि डिझेल 2.71 प्रति लिटरने महाग केले आहे. या वाढीनंतर दिल्लीत आता एक लिटर पेट्रोलची किंमत 102.12 आणि डिझेलची किंमत 95.20 झाली आहे.
महिनाभरात चौथ्यांदा चौथ्यांदा वाढल्या किंमती
यापूर्वी तेल कंपन्यानी 15 मे रोजीही किंमतींमध्ये तीन रुपये प्रति लिटरची वाढ करण्यात आली त्यानंतर 19 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सरासरी 90 पैशांची वाढ करण्यात आली व हे कमी होते की काय म्हणून 23 मे रोजी पेट्रोल 87 पैसे, डिझेल 91 पैशांनी महाग करण्यात आले व आता पुन्हा सोमवार, 25 मे रोजी पेट्रोल 2.61 प्रति लिटर आणि डिझेल 2.71 प्रति लिटरने महाग केले आहे.


चारही महानगरांमध्ये पेट्रोलचे असे झाले दर
दिल्ली 102.12 +2.61
कोलकाता 113.51 + 2.87
मुंबई 111.21 +2.72
चेन्नई 107.77 + 2.46
डिझेलचे नवीन दर
दिल्ली 95.20 +2.71
कोलकाता 99.82 + 2.80
मुंबई 97.83 + 2.81
चेन्नई 99.55 +2.57
पुन्हा महागाईचा भडका वाढणार
वाढत्या इंधन दरामुळे आता ट्रक आणि टेम्पोचे भाडे वाढणार असून इतर राज्यांतून येणार्या भाज्या, फळे आणि रेशन महाग होतील तसेच ट्रॅक्टर आणि पंपिंग सेट चालवण्यासाठी शेतकर्यांना जास्त खर्च करावा लागेल, ज्यामुळे धान्याचा खर्च वाढेल. सार्वजनिक वाहतूक आणि स्कूल बसच्या भाड्यातही वाढ दिसून येऊ शकते.






