दुचाकीला कट लागल्याच्या वादातून यावल बसस्थानकात एकाला तिघांची मारहाण


Three individuals assaulted a man at the Yawal bus stand following a dispute over a two-wheeler being cut off. यावल (26 मे 2026) : यावल बसस्थानकात बसने दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला एस.टी.आगारातील तिघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी सोमवारी तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

काय घडले यावल बसस्थानकात ?
यावल बसस्थानकावर वैशाली जितेंद्र सोनवणे ही महिला त्यांचे दीर महेंद्र सोनवणे यांच्यासह आल्या असता बस चालकाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. याचा जाब त्या विचारत असताना त्यांच्या दिराला सुनील रमेश कोळी, रफिक मुस्तफा शेख आणि एक अनोळखी अशा तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि ठार मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी वैशाली सोनवणे यांनी सोमवारी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !