भुसावळातील पोलीस हवालदार सुरज पाटील यांचा रावेर तालुका मराठा समाज कार्यकारीणीतर्फे गौरव


Police Constable Suraj Patil of Bhusawal honored by the Executive Committee of the Raver Taluka Maratha Community रावेर (26 मे 2026) : भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील हवालदार सुरज पाटील यांच्या कामगिरीची दखल घेत नुकतेच त्यांना पोलीस महासंचालक उत्कृष्ट सेवा पुरस्कार पदकाने गौरवण्यात आले होते. या कामगिरीची दखल घेत त्यांना रावेर तालुका मराठा समाज कार्यकारणीतर्फे गौरवण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी ज्येष्ठ समाज सेवक गंगाराम दाणी, सुधाकर महाजन, भाऊलाल महाजन, अशोक शिंदे, शाहीर अशोक गायकवाड, रावेर तालुका कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष उमाकांत पांडुरंग महाजन, उपाध्यक्ष सुरेश सोनू शिंदे, सचिव मोहन ओंकार महाजन, मुकेश नरेंद्र पाटील, देविदास नारायण महाजन, विजय पांडुरंग महाजन, प्रवीण हरी महाजन, रामा काशीनाथ महाजन, रत्नाकर महाजन, गणेश कडू महाजन, सुमंत भगवान महाजन, समाधान गंगाराम महाजन, विलास गोंडू महाजन, योगेश पूनमचंद महाजन, नितीन रवींद्र महाजन, संतोष रामदास महाजन, मुरलीधर प्रकाश महाजन आदींची उपस्थिती होती.

उत्तरोत्तर व्हावी प्रगती : मान्यवरांचा सून
हवालदार सुरज पाटील यांनी आतापर्यंत विविध गुन्ह्यांची उकल करीत मिळवलेले यश कौतुकास पात्र असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगत त्यांची अशाच पद्धत्तीने उत्तरोत्तर प्रगती व्हावी, असा सूर यावेळी मान्यवरांनी भाषणातून व्यक्त केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !