शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांना मुदतवाढ : मंत्री मंडळ बैठकीत चार धडाकेबाज निर्णय !
Extension Granted for Government Employee Transfers: Four Bold Decisions Taken in Cabinet Meeting! मुंबई (26 मे 2026) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांना मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
असे पारीत झाले निर्णय
सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामांतरण
कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करत सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. तो केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.
शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांना मुदतवाढ
राज्यातील शासकीय कर्मचार्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचा मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
बदली प्रक्रियेसाठी मिळणार अधिक वेळ
विशेष म्हणजे, 2026 मधील शासकीय कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ मिळाली आहे. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कामकाजातील विलंब टाळण्यासाठी असलेल्या 2005 च्या कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शासकीय कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे. बदली प्रक्रियेसाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे. प्रशासनातील कामकाज सुरळीत राहावे आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
डोंबिवलीतील मंदिराला जमीन
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील (मौजे सागाव सोनारपाडा) पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला चार एकर 25 गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागपूर रस्ते प्रकल्प
नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करण्यात येणार्या खाजगी जमिनीच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

