यावल तालुक्यात पुन्हा 4.63 लाखांच्या वीज तारांची चोरी


यावल (28 मे 2026) : यावल तालुक्यातील सातोद या गावापासून यावल कडे येणार्‍या रस्त्यावर तसेच चुंचाळे शिवारातुन सावखेडासीम शिवारात विद्युत वितरण कंपनीच्या ठेकेदारांच्या माध्यमातून काम सुरू आहे. या ठिकाणी खांबावर टाकलेले तब्बल चार लाख 63 हजार रुपये किंमतीच्या वीज तारांची चोरी झाल्याने खळब्ळ उडाली.

वाढत्या चोर्‍यांनी घबराट
तार चोरी झाले आहे. चुंचाळे येथून 18 खांबावरील 17 गाल्याचे तर सातोद रस्त्यावरून 28 खांबावरील 27 गाल्याचे तब्बल 7 हजार 300 मीटर लांबीचे तार चोरी झाले आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी देखील चुंचाळे शिवारातून तार चोरी झाल्याचे गुन्हे यावल पोलिसात दाखल असून विद्युत तार चोरी करणार्‍या चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टोळी सक्रिय झाल्याची भीती
सातोद या गावापासून यावलकडे येणार्‍या रस्त्यावर विद्युत वितरण कंपनीचे ठेकेदार अनिल उर्फ शेखर आत्माराम चौधरी रा. साकळी यांच्या वतीने खांब टाकण्याचे काम सुरू आहे. त्यांनी यावल शिवारातील चेतन खेडकर यांच्या शेत गट क्रमांक 268 पासून ते सातोद शिवारातील रमेश वामन तळेले यांचे शेत गट क्रमांक 104 पर्यंत 33 केव्ही तार 28 ठिकाणी खांब उभे करून 27 गाल्यांमध्ये टाकले होते. एकूण 4 हजार 050 मिटर लांबीचे विद्युत तार होते ज्यांची किंमत 2 लाख 83 हजार रुपये होती ते चोरी झाले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अनिल उर्फ शेखर चौधरी यांनी तक्रार दिली आहे.

यापूर्वी देखील चुंचाळे शिवारातून नायगाव रोडवरील व गायरान भागातून विद्युत तार चोरी गेले आहेत. याचे गुन्हे यावल पोलिसात दाखल आहे. तेव्हा तार चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात असून मोठ्या प्रमाणावर दोन ठेकेदारांचे तार चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

चुंचाळे शिवारातूनही तार चोरी
चुंचाळे गावाच्या शेतशिवारात आर.जी.नाना पाटील यांचे खडी-डांबरचे गोडाऊन पासून ते सावखेडासीम शिवारातील सावखेडासीम वॉटर फिल्टर पर्यंत राहुल दिनकर चौधरी (साकळी) यांनी 18 खांब उभे करून त्यावर 17 गाल्यात थ्री फेजचे 2 हजार 250 मीटर लांबीचे लघुददाबाचे तार टाकले होते. यांची किंमत एक लाख 80 हजार रुपये होती ते अज्ञात चोरट्याने चोरी केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार देण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !