एक लाखांच्या लाच मागणीप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Police Sub-Inspector Caught in ACB Trap for Demanding ₹1 Lakh Bribe अहिल्यानगर (28 मे 2026) : गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून एक लाखांवर तडजोड करणार्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने लाच मागणी प्रकरणात अटक केली आहे. या कारवाईने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जयेश मोतीलाल गांगुर्डे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या मामासह अन्य 15 नातलगांविरुद्ध 11 मे 2026 रोजी गुन्हा दाखल आहे व या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तब्बल दोन लाखांची लाच फौजदार जयेश गांगुर्डे यांनी मागितली होती. या संदर्भात 18 मे रोजी अहिल्यानगर एसीबीकडे तक्रार करण्यात आली व सापळा रचण्यात आला मात्र संशय आल्याने लाच स्वीकारली गेली नाही मात्र एसीबीकडे अहवाल येताच बुधवार, 27 रोजी रात्री फौजदाराला अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
या कारवाईत सापळा अधिकारी अहिल्यानगर एसीबीचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, चंद्रकांत भिमसन काळे, किशोर विठ्ठल कुंभार, शेखर बाळासाहेब वाघ आदींचा समावेश होता. तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.

