‘एआय’वर आधारीत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ची पुरवणी विद्यार्थ्यांसाठी ठरेल मार्गदर्शक : भुसावळात मंत्री संजय सावकारे
‘शिक्षणाच्या नव्या वाटा’ पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन : ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’वर शुभेच्छांचा वर्षाव
‘AI-based ‘Breaking Maharashtra’ Supplement Will Serve as a Guide for Students’: Minister Sanjay Savkare in Bhusawal भुसावळ (29 मे 2026) : भुसावळातील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या डिजिटल वेब पोर्टलने प्रिंट व डिजिटल क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. बदलत्या युगातील ‘एआय तंत्रज्ञान’ या विषयाला अनुसरून ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ले प्रसिद्ध केलेली पुरवणी विद्यार्थी व पालकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गार वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील सुरभी नगरातील संपर्क कार्यालयात मंत्री सावकारे व मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, 29 रोजी ‘शिक्षणाच्या नव्या वाटा’ या विषयावर आधारीत पुरवणीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
तर ‘एआय’बद्दलचे गैरसमज होतील दूर
मंत्री संजय सावकारे आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतात म्हणाले की, शिक्षणाच्या पद्धत्तीत आता आमुलाग्र बदल पहायला मिळत आहेत. आगामी काळात सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धत्तीने होणार असल्याने प्रत्येकाने स्वतःला अपडेट करून अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. एकीकडे युवापिढी नोकर्या नाहीत, असे म्हणते मात्र दुसरीकडे स्कील वर्करांची वाणवा आहे. एआय तंत्रज्ञान आपण नेमके समजून घ्यायला हवे त्यामुळे
एआयबद्दलचे निश्चितपणे गैरसमज दूर होतील. भुसावळातील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या वेबपोर्टलने ‘एआय’ या विषयाला अनुसरून शिक्षणावर आधारीत प्रकाशीत केलेली पुरवणी युवा पिढीसह विद्यार्थी व पालकांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गार याप्रसंगी मंत्री सावकारे यांनी व्यक्त केले.
प्रिंट व डिजिटल क्षेत्रात ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने उमटवला ठसा
हल्ली मुलांचा वाचनाचा कल कमी झाला असून नवपिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे मात्र वाचनही तितकेच गरजेचे असल्याचे मंत्री सावकारे म्हणाले. एआयमुळे नवीन जगाची सुरूवात झाली असून चांगल्या नोकर्या हव्या असतील तर तुम्हाला अपडेट होणे गरजेचे आहे. भुसावळातील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ वेब पोर्टलने बातम्यांची विश्वासार्हता जपली असून प्रिंट व डिजिटल क्षेत्रातही ठसा उमटल्याचे गौरवोद्गार मंत्री सावकारे यांनी काढले.
मान्यवरांकडून ‘ब्रेकिंग’वर शुभेच्छांचा वर्षाव
विशेष पुरवणी ठरेल मार्गदर्शक : शैलजा नारखेडे
प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे म्हणाल्या की, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ची विशेष पुरवणी विद्यार्थी व पालकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. समाजाभिमुख दिशा जोपासण्याचे काम ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने केले आहे.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ सर्वात पुढे : राजेंद्र आवटे
शिक्षण समिती सभापती राजेंद्र आवटे म्हणाले की, शहरासह राज्यातील घडामोडी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ वर सर्वप्रथम पहायला मिळतात त्यामुळे जनतेच्या मनात या वेबपोर्टललला पहिले स्थान आहे. ‘शिक्षणाच्या नव्या वाटा’ ही शैक्षणिक पुरवणी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शकाचे काम करणार असल्याचेही आवटे म्हणाले.
विद्यार्थ्यांसाठी पुरवणी ठरेल पथदर्शी
डॉ.निलेश चांडक यांनी ‘शिक्षणाच्या नव्या वाटा’ या विशेष पुरवणीचे तोंड भरून कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी ही पुरवणी निश्चितपणे पथदर्शी ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त करीत वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिक्षण क्षेत्रावरील पुरवणी मार्गदर्शक
सीए रोहित कोलते म्हणाले की, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ने शिक्षण क्षेत्रातील आधारीत काढलेली पुरवणी निश्चितपणे कौतुकास्पद आहे. अभ्यासपूर्ण लेखांमुळे विद्यार्थ्यांना निश्चितच यातून मार्गदर्शन मिळेल.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ च्या उपक्रमास शुभेच्छा
भाजपा गटनेता युवराज लोणारी यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या शैक्षणिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांसाठी ही पुरवणी दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. स्थानिक असो की राज्यभरातील अपडेट बातम्या त्यासाठी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ नेहमीच सर्वात वेगवान पुढे राहिला असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, भाजपा गटनेता युवराज लोणारी, शिक्षण समिती सभापती राजेंद्र आवटे, नगरसेविका सोनल महाजन, शोभा इंगळे, संध्या सातदिवे, कोलते फाउंडेशनचे संचालक व सीए रोहित कोलते, जळगावातील चांडक कॅन्सर हॉस्पीटलचे संचालक डॉ.निलेश चांडक, माजी सदस्य समाधान पवार आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, ‘ब्रेकिंग’चे कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी प्रास्ताविक तर बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.जगदीश पाटील यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, जाहिरातदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

