महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद

जळगावातील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम


जळगाव (30 मे 2026) : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील प्रसुती व स्त्रीरोग परिचर्या विभागातर्फे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य हक्क, लैंगिक व प्रजनन आरोग्य तसेच सर्वांसाठी समतोल आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील प्रसूती व स्त्री रोग विभागातील ज्युनिअर रेसिडेंट-2 डॉ.ऐश्वर्या चालवाडे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी सक्षम आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व, आरोग्य हक्कांचे संरक्षण तसेच विविध सामाजिक व जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या परिसंवादास महाविद्यालयातील प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न तसेच पदवीपूर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !