अंजाळे घाटात भीषण अपघातात यावलचा दुचाकीस्वार ठार
Two-wheeler rider from Yawal killed in horrific accident in Anjale Ghat on the Yawal-Bhusawal route यावल (30 मे 2026) : यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटावर डंपरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात यावलचा दुचाकीस्वार ठार झाला तर दुसरा गंभीर जख्मी झाला.
असा घडला अपघात
अपघाता संदर्भात मिळालेली माहिती अशी की, लखन जोहरी (यावल) हे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.यु.6521) या दुचाकी वाहनाने भुसावळकडून यावलकडे येत असतांना यावलहुन भुसावळकडे भरधाव वेगाने जाणार्या चारचाकी डंपर (एम.एच.19 सी.वाय.6651) ने जोहरी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने लखन अशोक जोहरी (32, यावल) यांचा जागीच मृत्यू झाला तर मयताच्या वहिनी अनिता संदीपसिंग जोहरी (50) या जखमी झाल्याने उपचारासाठी त्यांना जळगावी हलविण्यात आले.
