विधानपरिषद निवडणूक : महायुतीचे जागा वाटप ठरले ! जळगाव, नाशिकसह 11 जागा भाजपाकडे


Legislative Council Elections : Mahayuti’s Seat-Sharing Finalized! BJP Secures 11 Seats, Including Jalgaon and Nashik. जळगाव (31 मे 2026) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा अखेर तिढा सुटला आहे. जागा वाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचनंतर महायुतीत अखेर अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजपाला 11, शिवसेना चार तर राष्ट्रवादी दोन जागांवर निवडणूक लढवेल. दरम्यान, जळगाव, नाशिकसह 11 जागा भाजपाच्या वाटेला आल्या आहेत. दरम्यान, सात जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लाग.

महायुतीचे अंतिम जागावाटप असे
भाजप -11
शिवसेना – 4
राष्ट्रवादी काँग्रेस – 2

भाजपाच्या वाटेला या जागा
1) सोलापूर-
2) जळगाव-
3) भंडारा-गोंदिया
4) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
5) अमरावती-
6) धाराशिव-लातूर-बीड
7) नागपूर-
8) छ.संभाजीनगर- जालना
9) अहिल्यानगर-
10) सांगली-सातारा
11) नांदेड-

शिवसेनेच्या वाटेला या जागा
1) ठाणे-
2) नाशिक-
3) परभणी-
4) यवतमाळ-

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या दोन जागा
1) कोकण-
2) पुणे-

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (सकाळी आठ ते दुपारी चार)
मतमोजणी- 22 जून


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !