भाजपाने अखेर सस्पेन्स संपवला : जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजनांना उमेदवारी जाहीर ; जाणून घ्या राज्यनिहाय उमेदवारांची नावे
गणेश वाघ
BJP Finally Ends Suspense: Nandkishore Mahajan Announced as Candidate for Jalgaon Legislative Council Seat भुसावळ (31 मे 2026) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा राज्यातील तिढा सुटल्यानंतर जळगावातून उमेदवारी कुणाला मिळणार? याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागून असतानाच विविध उमेदवारांची नावे चर्चेत आली होती मात्र आता सस्पेन्स संपला असून रावेरचे नंदकिशोर महाजन यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
राज्यातील फॉर्म्यूला अखेर ठरला
जागा वाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचनंतर महायुतीत अखेर अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजपाला 11, शिवसेना चार तर राष्ट्रवादी दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे.
जळगावातील जागा भाजपाकडेच : नंदकिशोर महाजनांना उमेदवारी
जळगावातील जागेबाबत अनेक उमेदवारांची नावे चर्चेत होती. डॉ.केतकीताई पाटील, नंदकिशोर महाजन यांच्यासह चौघांची नार्वे चर्चेत होती मात्र पक्ष श्रेष्ठींनी रावेरचे नंदकिशोर महाजन यांच्या नावाला अखेर पसंती दिली आहे. रात्री उशिरा नाव निश्चितीची घोषणा करण्यात आली. महाजन हे गुजर समाजाचे आहेत.
राज्यनिहाय भाजपाचे असे आहेत उमेदवार
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली- अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
अमरावती- प्रवीण पोटे-पाटील
सांगली-सातारा- धैर्यशील कदम
सोलापूर- राजेंद्र राऊत
अहिल्यानगर- प्राजक्त तनपूरे
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
नांदेड- अमर राजूरकर
धाराशीव-लातूर-बीड- बसवराज पाटील
जळगाव- नंदकिशोर महाजन
नागपूर- डॉ.राजीव पोतदार
