स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : भाजपातर्फे नंदकिशोर महाजनांनी दाखल केला उमेदवारी अर्ज


जळगाव (1 जून 2026) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने सुरूवातीपासून जागेवर दावा केला होता व ही जागा कायम ठेवण्यात पक्षाला यश आले व रावेर तालुक्यातील नंदकिशोर महाजन यांना अखेरच्या क्षणी भाजपाने उमेदवारी दिली. महाजन यांनी सोमवार, 1 जून रोजी अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पक्ष पदाधिकार्‍यांची बैठक
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेत महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन करतांना जळगाव जिल्ह्यात महायुती अधिक बळकट व्हावी तसेच विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वांनी संघटीतपणे आणि एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

बैठकीनंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नंदकिशोर महाजन यांचा शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तत्पूर्वी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच पक्षाचे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष यामुळे संपूर्ण वातावरण युतीमय झाले.

महायुतीतील पदाधिकारी सहभागी
यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री गुलाबराव देवकर, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पाटील, जळगाव महापौर दीपमाला काळे यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !