भुसावळातील जय गणेश फाउंडेशनतर्फे उद्या पर्यावरण जनजागृती बैठक

शहरातील पर्यावरण प्रेमींना उपस्थिती देण्याचे आवाहन


An environmental awareness meeting will be organized tomorrow by the Jai Ganesh Foundation in Bhusawal भुसावळ (2 जून 2026) : भुसावळ शहर व परिसरातील तापमान दरवर्षी झपाट्याने वाढत आहे. झाडांच्या कत्तली होत असतानाच त्या प्रमाणात नवीन वृक्ष लागवड होत नाही आहे. त्यासाठी जनजागृती अभियान राबवून झाडांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण साठी सामूहिक प्रयत्न करणे यासाठी शहरातील व परिसरातील पर्यावरण विषयी काम करणार्‍या संस्था,सामाजिक, शैक्षणिक संस्था तसेच पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या बैठकीचे आयोजन जय गणेश फाउंडेशनतर्फे बुधवार, 3 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता नवसाचा गणपती मंदिर, सुरभी नगरात करण्यात आलेले आहे.

वृक्षारोपणासह संवर्धनाचा संकल्प
बैठकीत प्रामुख्याने झाडांचे महत्त्व व पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण मोहीम व त्याची अंमलबजावणी, वृक्षतोडीची समस्या व उपाययोजना, जनसहभागातून पर्यावरण संरक्षण, वाढते तापमान- करणे व परिणाम आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. शहरातील सर्व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, अध्यक्ष राजेंद्र यावलकर आणि सचिव तुकाराम आटाळे यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !