भुसावळ तालुक्यात खरीप हंगामासाठी 12535 टन रासायनिक खतांची मागणी

सरळ खतांसोबत मिश्र खतांनाही वाढतेय पसंती


Demand for 12,535 tonnes of chemical fertilizers for the Kharif season in Bhusawal Taluka. भुसावळ (2 जून 2026) : भुसावळ तालुक्यातील खरीप हंगामासाठी यंदा 12 हजार 535 मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी पंचायत समिती कृषी विभागाने नोंदवली आहे. यात सर्वाधिक युरिया या खताचा 4500 मेट्रीक टन वापर होणार आहे. या खालोखाल 2113 मेट्रीक टन सिंगल सुपर फास्फेट या खताचा वापर होईल. युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आदींसह मिश्र खतांचीही खरिपाच्या हंगामासाठी गरज भासणार असून याबाबतची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविण्यात आली आहे.

शेतकर्‍यांकडून अधिक खतांचा वापर
खरिपाच्या हंगामात पिकांची वाढ होण्यासाठी युरिया या खताचा वापर अधिक प्रमाणात होणार आहे. आगामी हंगामासाठी 4500 टन युरियाची गरज भासणार आहे. तर 585 मेट्रीक टन डीएपी, 1138 टन एमओपी, 2113 टन एसएसपी, यासोबतच 10-26-26, 15:15:15, 19:19:19, 20:20:00 आदींसह अन्य मिश्र खतांचा वापरही होणार आहे मात्र शेतकर्‍यांकडून मिश्र खतांऐवजी सरळ अर्थात युरिया, पोटेश व फास्फेट या खतांना अधिक प्रमाणात मागणी असते. पिकांच्या वाढीसाठी शेतकर्‍यांकडून युरिया या खताचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. यंदाही तो अधिक असेल.

मिश्र खतांचीही मागणी वाढतेय
भुसावळ तालुक्यात खरिप हंगामात आता मिश्र खतांचीही मागणी वाढत आहे. 14:35.14 हे मिश्र खत 19 टन, 15:15:15 हे मिश्र खत 788 टन, 16:16:16 हे खत 56 टन तर 20:20:0 या मिश्रखतांनाही मागणी राहणार आहे. गेल्या काही वर्षांत सरळ खतांसोबतच मिश्र खतांचीही मागणीत वाढ होत आहे.

400 टन बफर स्टॉक
भुसावळ तालुक्यात आगामी खरीप हंगामात रासायनिक खतांचा तुटवडा नाही. 400 टन युरियाचा राखीव अर्थात बफर स्टॉक उपलब्ध असेल. टंचाई निर्माण झाल्यास जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार त्याचे वितरण होईल. शेतकर्‍यांनी काही तक्रारी असल्यास तालुका व पंचायत समिती कृषी विभागाकडे संपर्क साधावा, असे पंचायत समिती कृषी अधिकारी पी.एल.धांडे यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !