भीषण अपघातात चाळीसगाव तालुक्यातील दोघा बहिणींचा मृत्यू तर आई-वडील गंभीर

दहिवाळजवळ छोटा हत्ती वाहनाला भरधाव पिकअपने उडवले : अपघातानंतर हिरापूरला शोककळा


Two Sisters from Chalisgaon Taluka Die in Horrific Accident; Parents Critically Injured चाळीसगाव (3 जून 2026) : कार्यक्रमासाठी गेलेल्या कुटूंबाच्या छोटाहत्ती वाहनाला भरधाव पिकअप वाहनाने जबर धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावातील दोघा बहिणींचा मृत्यू झाला तर आई-वडील गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात मालेगाव तालुक्यातील दहिवाळ फाट्याजवळ घडला. या अपघातात अन्य दोघेही गंभीर असून हिरापूर गावात अपघाताने शोककळा पसरली आहे.

असा घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, हिरापूरचे रहिवासी राकेश शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसह मालेगाव येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते छोटा हत्ती वाहनाने गावाकडे परतत असताना दहिवाळ फाट्याजवळ समोरून येणार्‍या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

दोघा बहिणींचा मृत्यू तर आई-वडीलांसह चौघै गंभीर
या भीषण अपघातात जयश्री राकेश शिंदे (19) हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरी मुलगी नंदिनी शिंदे (16) हिची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या अपघातात राकेश शिंदे, त्यांची पत्नी, अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणींचा अल्पावधीत मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !