नाशिक परिक्षेत्रातील सहा पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या ; भुसावळ शहर निरीक्षकांची अहिल्यानगर जिल्ह्यात बदली

भुसावळ शहरचे उद्धव डमाळे अहिल्यानगर जिल्ह्यात बदली


गणेश वाघ
Request-based Transfers of Six Police Inspectors in the Nashik Range; Bhusawal City Inspector Transferred to Ahilyanagar District. भुसावळ (4 जून 2026) : नाशिक परिक्षेत्रातील पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीवरून विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सहा पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल केल्या आहेत तर उर्वरित 11 जणांची विनंती अमान्य करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या अधिकार्‍यांमध्ये जळगाव, धुळे, नाशिक ग्रामीण, अहमदनगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतील अधिकार्‍यांचा समावेश आहे.

या अधिकार्‍यांच्या झाल्या विनंती बदल्या

भुसावळ शहर ठाण्याचे निरीक्षक उद्धव कोंडीबा डमाळे यांची अहिल्यानगर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील दीपक दगडू पाटील यांची जळगाव जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीणमधील हेमंतकुमार भामरे यांची धुळे जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संजय जयराम सोनवणे यांची अहिल्यानगर जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

या अधिकार्‍यांच्या विनंती बदल्या अमान्य
कावेरी कमलाकर (जळगाव), विनोद पाटील (धुळे), समाधान वाघ (धुळे), निवृत्ती पवार (धुळे), जयपाल हिरे (धुळे), प्रतापसिंग बहुरे (नाशिक ग्रामीण), संतोष भंडारे (अहिल्यानगर), किरण शिंदे (अहिल्यानगर), सुनील भाबड (नंदुरबार), महेंद्र चव्हाण (नंदुरबार), सारंगधर नवलकर (नंदुरबार), सुनील बडगुजर (नंदुरबार)

अधिकार्‍यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश
आदेशानुसार सर्व संबंधित पोलीस निरीक्षकांनी तत्काळ नवीन कार्यस्थळी रुजू व्हावे. बदली झालेल्या अधिकार्‍यांना कार्यमुक्त करताना कोणत्याही प्रकारचा विलंब करू नये तसेच निवडणूक प्रक्रिया किंवा न्यायालयीन आदेशांच्या कारणास्तव कोणतीही अडचण असल्यास त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले असून त्याची प्रत संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !