जळगाव राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भुकन यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : यावलला पत्रपरिषदेत उमेश नेमाडे यांची मागणी
यावल (4 जून 2026) : यावल पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध, बनावट आरोग्यास घातक अशा विक्री होणार्या विषारी दारूमुळे एकाच गावात सहा सहा महिन्यात अनेकांचा मृत्यू ओढवल्याने विषारी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली मात्र तरीही विषारी दारू सर्रासपणे विक्री होत असल्याने जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भूकंन यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) रावेर लोकसभा अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी यावलला आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी सायंकाळी शहरातील सुमाई मंगल कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली.
काय आहे नेमाडे यांचा दावा ?
नेमाडे म्हणाले की, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कसा कोसळतो हे समाजाला, शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना चांगल्या प्रकारे ज्ञात असले तरी यावल पोलीस स्टेशन अंतर्गत बनावट विषारी पत्नीची दारू तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. मागणी केल्यानंतर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे तत्काळ कारवाई करण्यात आली परंतु विषारी दारू विक्री सुरू ठेवायची असेल तर संबंधितांनी तक्रारदारांच्या नावाखाली विषारी दारू विक्रेत्यांकडून हप्त्याची रक्कम वाढवून घेतली त्यामुळे विषारी दारू सर्रासपणे विक्री सुरू आहे. ती विषारी दारू विक्री यावल पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने तत्काळ बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गावागावातील महिलांच्या, नागरिकांच्या माध्यमातून तीव्र असे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देत दारू उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भूकंन यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दोन दिवसापूर्वी केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली.
यांची पत्रकार परिषदेल उपस्थिती
पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष राकेश सोनार, माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, अॅड.देवकांत पाटील, शहर कार्याध्यक्ष कदीर खान, भुसावळ शहराचे नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी, युवक तालुका अध्यक्ष आकाश चोपडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाटील, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय बोरोले, मोसीन खान, समाधान पाटील, अरुण लोखंडे, जुगल पाटील आदी उपस्थित होते.



