न्हावीतील दुचाकीस्वार अपघातात ठार : पत्नी जखमी
फैजपूर (5 जून 2026) : पत्नीसोबत दुचाकीवरून जात असताना दुचाकीस्वाराला भोवळ आली मात्र त्याने वाहन न थांबवता चालवल्यानंतर हे वाहन इलेक्ट्रीक पोलवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाला. हा अपघात आमोदा गावाजवळील बसस्थानकाजवळ 4 रोजी दुपारी दिड वाजता घडला. भगवान वावधन चोपडे (54, न्हावी, ता.यावल) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
भोवळ आल्याने अपघात
रमेश टिकाराम चोपडे (49, न्हावी, ता.यावल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे चुलत बंधू भगवान चोपडे हे 4 रोजी दुपारी दुचाकीवरून पत्नीसह जात असताना त्यांना दुचाकीवर भोवळ आली व पत्नीने दुचाकी थांबवण्यास सांगूनही त्यांनी दुचाकी चालवल्याने ही दुचाकी इलेक्ट्रीक पोलवर आदळली व या अपघातात चोपडे यांचा मृत्यू झाला व दुचाकीचेही मोठे नुकसान झाले तर त्यांची पत्नी जखमी झाले. स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरणार्या चोपडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संतोष चौधरी करीत आहेत.



