भुसावळातील युवकाचे खून प्रकरण : संशयीताना घटनास्थळावर नेत पोलिसांनी जाणला हल्ल्याचा घटनाक्रम
भुसावळ (5 जून 2026) : पूर्व वैमनस्यातून मारहाण करण्यात आल्याने भुसावळातील व्हीआयपीसीटी कॉलनी परिसरातील मंगेश काळे (26) या तरुणाचा मृत्यू ओढवला होता. तरुणाच्या मृत्यू प्रकरणी कुंदन अनिल पठारे (19, वाल्मीक नगर, भुसावळ) व रोहित उर्फ दादू संजय नवगिरे (21, वाल्मीक नगर, भुसावळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतल्यानंतर त्यास बालन्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती तर अन्य दोघांना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
आरोपींनी नेत गुन्ह्याची पडताळणी
पोलिसांनी आरोपींकडून महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास दोन्ही आरोपींना शहरातील नाहाटा कॉलेज चौकापासून पुढील चौकापर्यंत पायी नेण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्हा घडलेल्या ठिकाणांची, हालचालींची तसेच हल्ल्याच्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती घेतली. तपासाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी घटनास्थळाशी संबंधित विविध बाबींची पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, या खूनप्रकरणात अद्याप तीन आरोपी पसार असून,
त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



