जळगाव विधान परिषद निवडणूक : आदर्श आचारसंहिता भंगाबाबत तक्रारींसाठी आचारसंहिता कक्ष कार्यान्वित


जळगाव (5 जून 2026) : महाराष्ट्र विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास अथवा त्यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी आचारसंहिता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यात व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमची 33 पथके तसेच फ्लाइंग स्क्वॉडची 33 पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत जिल्हाभर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असून आचारसंहितेचा भंग करणार्‍यांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांनी 0257-2220600 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !