भुसावळ शहर पोलिसांची मोठी कारवाई : गावठी कट्ट्यासह दोन संशयीत जाळ्यात

संशयीताकडून दोन जिवंत राऊंड व चाकूदेखील जप्त : कारवाईने शहरात खळबळ


Major crackdown by Bhusawal City Police: Two suspects nabbed with a country-made pistol. भुसावळ (5 जून 2026) : भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत दहशतीच्या उद्देशाने दोघे गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती भुसावळ शहर निरीक्षक उद्धव डमाळे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या निर्देशानंतर पथकाने धडक कारवाई करीत दोघांच्या मुसक्या बांधल्या. आरोपींकडून गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि धारदार चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव झमाळे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, जळगाव रोड परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी आणण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. शुक्रवार, 5 जून 2026 रोजी रात्री 12.20 वाजता हिरो होंडा शोरूममागे एका दुचाकीवर असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांची नावे विशाल दादा सुरवाडे (30, रा.भुसावळ) व शुभम बबन वैद्य (35, दोन्ही रा.भुसावळ) सांगितली.



आरोपींविरोधात गुन्हा दाखल
आरोपींकडून 10 हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा, दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत राऊंड व 300 रुपये किंमतीचा स्टेनलेस स्टीलचा धारदार टोकदार चाकू असा एकूण सुमारे 12 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक उद्धव झमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, पोलीस कर्मचारी राहुल भोई, राहुल बेहेनवाल, दीपक शेवरे व गुन्हे शाखेचे राहुल वानखेडे आदींनी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !