रावेर तालुक्यात वादळाने 225 कोटींवर नुकसान : आमदार अमोल जावळेंनी केली पाहणी


Storm causes damage worth over ₹225 crore in Raver Taluka; MLA Amol Jawale conducts an inspection. रावेर (6 जून 2026) : रावेरसह यावल तालुक्यात गुरुवार, 4 जून रोजी सायंकाळी ताशी 60 किलोमीटर वेगाने आलेल्या चक्रीवादळाने शेतकर्‍यांच्या हाता-तोंडातील घास हिरावला आहे. यापूर्वी 28 मे आलेल्या वादळानेही शेतकर्‍यांचा आर्थिक कणा मोडल्यानंतर पुन्हा आलेल्या वादळाने रावेर तालुक्यात सुमारे 225 कोटींवर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आमदार अमोल जावळे यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी करीत मदतीसंदर्भात शेतकर्‍यांना आश्वस्त केले तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

57 लाख केळी खोड जमीनदोस्त
रावेर तालुक्यात गुरुवार, 4 जून रोजी सायंकाळी 6.15 ते 7 वाजेदरम्यान ताशी 60 किमी वेगाचे चक्रीवादळ आले सोबतच पावसासह गारपीटही झाल्याने 23 गावांतील शेती शिवारातील 2085 शेतकर्‍यांचे 1997 हेक्टर क्षेत्रातील सुमारे 57 लाख 50 हजार केळीखोड जमीनदोस्त झाल्याने सुमारे 227 कोटी रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय, वादळामुळे 465 घरांवरील पत्रे उडून गेल्याने जीवनावश्यक वस्तूंचे सुमारे चार कोटी 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज रावेरचे नायब तहसीलदार संजय तायडे यांनी वर्तवला.

167 झाडे उन्मळली
वादळामुळे संपूर्ण तालुक्यात सुमारे 167 मोठी झाडे उन्मळली. बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील विवरे-वडगाव दरम्यान अवघ्या काही अंतरात 13 मोठ-मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने गुरुवारी सायंकाळी सात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !