नियंत्रण सुटलेल्या ट्रॅक्टरने चिरडल्याने साक्री तालुक्यातील बालिका ठार


Girl from Sakri taluka killed after being crushed by out-of-control tractor साक्री (6 जून 2026) : ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्यानंतर वाहन रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात पाच वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात साक्री तालुक्यातील शेवाळी फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी घडला. शिवण्या सुरेश बोरात (5, कळंभीर) असे मृत बालिकेचे नाव आहे.

असा घडला अपघात
बालिका शिवण्या शुक्रवारी सकाळी शेवाळी फाट्याजवळ मेंढ्या चारत असतानाच याचवेळी एक ट्रॅक्टर टेकडीवरून खाली येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व अनियंत्रीत होवून बालिकेच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने बालिकेला बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉ.श्रीकांत पाटील यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. पोलिसात ट्रॅक्टर चालकाविरोधात विविध कलामांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !